गोपाळ नांदुरकर

गोपाळ नांदुरकर यांनी पुण्यातल्या अभिनव कला महाविद्यालयातून अप्लाइड आर्टची पदवी प्रथम श्रेणीत, गुणवत्ता यादीत तिसरा क्रमांक मिळवून संपादित केली असून सध्या ते स्वतंत्रपणे पेंटिंगच्या तसंच डिझाइनच्या क्षेत्रात काम करत आहेत.

नांदुरकरांनी ‘कलाकल्प’ हा ड्राइंग आणि पेंटिग, लॅण्डस्केप्स आणि पोर्ट्रेट शिकण्याचा पोस्टल कोर्स विकसित केला आहे. याशिवाय ते वर्कशॉप्सही आयोजित करतात. राजा मंगळवेढेकर लिखित सुलभ रामायण आणि सुलभ महाभारत या पुस्तकांत त्यांनी काढलेली चित्रं विशेष गाजली. त्यांनी पुस्तकांसाठी काढलेल्या कामांचे स्वतंत्र प्रदर्शन सर जे.जे. स्कूल ऑफ अप्लाइड आर्टमध्ये आयोजित करण्यात आलं होतं.

चित्रकार रवी परांजपे यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त बालगंधर्व येथे झालेल्या ‘सगुण-निर्गुण’ या ग्रुप शोमध्ये गोपाळ यांचा सहभाग होता.

Books by The Illustrator