ऋजुता घाटे

ऋजुता घाटे यांनी मुंबईच्या सर जे.जे. उपयोजित कलामहाविद्यालयातून बी.एफ.ए. (ॲप्लाईड आर्ट्स) ही पदवी मिळवली. काही काळ त्यांनी ॲनिमेशन क्षेत्रात काम केले. गेली २२ ते २५ वर्षं त्या लहान मुलांच्या पुस्तकांसाठी मुक्त चित्रकार म्हणून काम करत आहेत.

त्यांनी मराठीतील अनेक मान्यवर प्रकाशन संस्थांसाठी मुलांच्या २५ पुस्तकांची मुखपृष्ठं आणि सजावटीचे काम केले आहे. त्याचप्रमाणे ‘सकाळ’मधून त्यांच्या लहान मुलांच्या कथा, कविता आणि चित्रे प्रकाशित झाली आहेत. याखेरीज प्रथम – रीड इंडिया आणि प्रथम – मुंबई एज्युकेशन इनिशिएटीव्ह, युनिसेफ आणि इतरही सामाजिक संस्थांसाठी चित्रकार म्हणून ऋजुता यांनी काम केले आहे. त्यात त्यांनी सुमारे ३० पुस्तकांची मुखपृष्ठं आणि आतील चित्रं काढली आहेत.

मांजर हा ऋजुता यांचा आवडता प्राणी आहे आणि त्यांना मांजरांची चित्रं काढायलाही फार आवडतं. याखेरीज पक्षी निरीक्षण, छायाचित्रण आणि ओरिगामी करणे हे त्यांचे छंद आहेत.