उजेडाचा गाव

लेखकः

डॉ. संगीता बर्वे

चित्रकार :

ऋजुता घाटे

ISBN :

978-81-7925-327-4

पाने :

32

आवृत्ती :

पहिली आवृत्ती २०१३

पुनर्मु्द्रण :

चौथे पुनर्मु्द्रण २०२५

35.00

About the book

वयोगट ३+

सुंदर चित्रे असलेले मुलांच्या कवितांचे पुस्तक.

ऊन

पक्षी उठले
गात सुटले
पहाटेचे गाणे…
गवतावरती
लोळू लागले
ऊन गोजिरवाणे!

रांगत रांगत
फिरू लागले
पायवाटांवरून
अचानक
पडले की ते
धपकन
खडकावरून!..

पडता पडता
इवले ऊन
इतके मोठ्ठे झाले
हात पाय पसरून
थेट घरामध्येच आले!