गोल गोल
| लेखकः | मंदाकिनी गोडसे |
|---|---|
| चित्रकार : | राहुल देशपांडे |
| ISBN : | 978-81-7925-149-2 |
| आवृत्ती : | पहिली आवृत्ती २००७ |
| पाने : | 24 |
| पुनर्मुद्रण : | चौथे पुनर्मुद्रण २०२४ |
₹35.00
About the book
मंदाकिनी गोडसे यांच्या मुलांना आवडतील अशा कविता. सोबत राजू देशपांडे यांची अप्रतिम चित्रे.
या कविता सोप्या सहजसुंदर आहेत.
बोका –
कोण्या एका गावामध्ये
एक होता बोका-
घरोघरच्या दह्यादुधाला
रात्रंदिवस धोका!
लांबच लांब मिशा आणि
कवड्यासारखे डोळे
अंधारात चमकले की
घाबरायचे सारे!
बोकोबाचं अंग होतं
गोरं गोरं पिठ्ठ
हवं तेवढं खाऊन पिऊन
झाला होतं लठ्ठ!









