पाशा
| लेखक : | ज्योती सोलापूरकर |
|---|---|
| अनुवादक : | रमेश मुधोळकर |
| चित्रकार : | पुंडलीक वझे |
| पाने : | १०३ |
| ISBN: | 978-81-7925-304-5 |
Out of stock
₹0.00
Out of stock
पुस्तकाबद्दल
वयोगट १० +
“बाबा, हे बघितलंत का काय आहे ते,” दीपक आणि आनंदने उत्साहाने विचारलं. “हे छोटं कुत्र्याचं पिल्लू मंडईपासून आईच्या पाठोपाठ आपल्या घरापर्यंत आलं. आपण त्याला पाळायचं का?”
“बाबांनी त्या काळ्या-पांढऱ्या पिल्लाकडे बघितलं.
“प्लीज बाबा,”हो म्हणा ना!” दोघं त्यांचे हात ओढत विनवू लागले. बाबांनी त्यांच्या छोट्या आशाळभूत चेहऱ्यांकडे पाहिलं.त्यांच्या डोळ्यांतली विनवणी आणि उत्सुकता बघून त्यांनी म्हटलं, “हं! ते दिसायला तर छान आहे. तुम्ही त्याला पाळायला हरकत नाही!”





