आजी कुठे गेली?

चित्रकार :

शुभम लखेरा

अनुवादक :

सोनाली दातार

पाने :

16

आवृत्ती :

पहिली आवृत्ती 2025

आकार :

8.5 x 10.5

ISBN:

978-81-993899-0-8

100.00

About the book

मूल लहान असतानाच्या काळात ते जगाबद्दलचे आपले मत बनवत असताना त्याला विविध संकल्पनांविषयी जाणीव करून देणे महत्वाचे आहे, यामुळे त्याचे मन लवचिक बनेल व दीर्घकालीन टिकणाऱ्या चुकीच्या समजुती व कल्पना त्याच्या मनात कायमस्वरूपी न रूजण्यास मदत होईल. याच वयात परंपरागत कल्पनांना छेद देणारे दृष्टिकोनही मुलांसमोर ठेवावेत, ज्यामुळे वस्तुस्थितीविषयी वेगळा दृष्टिकोन मिळण्यास तसेच समाजातील परंपरागत समजुती यांबद्दलच्या प्रश्नांवर विचार करण्यात त्यांना मदत होईल.

‘आजी कुठे गेली?’ या पुस्तकातील लहान मुलीला आपली आजी कुठे जाते याबाबत कुतूहल वाटते आहे. याचा शोध घेण्याच्या प्रक्रियेमध्ये वेगवेगळी माणसे कोणती वेगवेगळी कामे करतात, याबद्दल तिला समजते.