सुलभ रामायण
| लेखक : | राजा मंगळवेढेकर |
|---|---|
| चित्रकार : | गोपाळ नांदूरकर |
| आवृत्ती : | पहिलीआवृत्ती 1973, दुसरी आवृत्ती 2000, बारावे पुनर्मुद्रण 2023 |
| पाने : | 110 |
| ISBN: | 978-81-7925-237-6 |
₹150.00
About the book
वयोगट १०+
भारतात युगानुयुगे सांगितल्या जाणाऱ्या रामकथेचे दोन पैलू आहेत. ती भक्तिभावाने ऐकणारे लोक रामायणातल्या सगळ्या आदर्शांची पूजा करतात; त्याच वेळी लहानग्यांना मात्र रामाचे शौर्य, भरताचे बंधुप्रेम, हनुमानाची दास्यभक्ति, बिभीषणाचा धीरोदात्तपणा या आणि अशा आचरणात आणण्यायोग्य अनेक गुणांचा ठेवा रंजकतेने अनुभवायला मिळतो.
समोर येणाऱ्या सुखदु:खांचा, कसोटी पाहणाऱ्या कठीण प्रसंगांचा सामना करताना बरेचदा वाट सापडत नाही.अशा वेळी एकवचनी, एकबाणी, मर्यादापुरुषोत्तम रामाची भक्ती आपले दु:ख दूर करण्याचे बळ देते. लहानपणापासून जर असे आदर्श समोर असतील, तर कुठल्याही प्रकारचा पेच सोडवण्यासाठी कशा पद्धतीने विचार करायला लागेल याची गुरुकिल्लीच गवसते.
म्हणूनच जोवर माणूस आहे आणि त्याला वाणी व भाषा आहे, तोवर रामायण आहे!









