ओरिगामी
| लेखक: | रत्नाकर महाजन |
|---|---|
| छायाचित्रे : | शैलेंद्र परदेशी, रमा हर्डीकर |
| ISBN : | 978-81-7925-342-7 |
| आवृत्ती : | पहिली आवृत्ती 2010, दुसरी आवृत्ती 2013, तिसरे पुनर्मुद्रण 2024 |
| पाने : | 126 |
Original price was: ₹325.00.₹260.00Current price is: ₹260.00.
About the book
वयोगट १०+
कागदाच्या एका तुकड्याला घड्या घालून किती विविध प्रकारच्या सुंदर वस्तू करता येतात हे बघितलं की मन अक्षरशः थक्क होते. आणि विशेष म्हणजे ह्या वस्तू कागद न कापता, न चिटकवता केल्या जातात. ओरिगामीद्वारे फुले, फुलपाखरे, पक्षी, प्राणी, किडे, चेहरे-मुखवटे, बॉक्सेस अशा असंख्य वस्तू तयार करता येतात.
ही कला सर्व वयोगातील आहे आणि त्यापासून मिळणारे फायदेही वेगवेगळे आहेत.
ओरिगामीमुळे मुलांमध्ये कौशल्य, एकाग्रता आणि सर्जनशीलता वाढण्यास मदत होते. मेंदूच्या दोन्ही बाजू कार्यप्रवण करण्याची अद्भुत किमया या कलेत आहे. आपण नेहमी उजव्या हाताचा वापर जास्त करत असतो, त्यामुळे आपल्या मेंदूची डावी बाजू कार्यप्रवण होते. मात्र ओरिगामीत डावा हातही तितकाच वापरला जातो. त्यामुळे मेंदूची उजवी बाजूही कार्यप्रवण होण्यास मदत होते. ताणतणाव कमी करण्यासाठी ओरिगामी फायदेशीर ठरते.
या पुस्तकातली सुरुवातीची मॉडेल्स सोपी आहेत. त्यानंतर थोडी अवघड व शेवटी जास्त अवघड मॉडेल्स दिली आहेत. आपण जसजसे सराव करत जाऊ तसतसे मॉडेल्स करणं सोपं होत जातं.









