प्राण्यांची गाणी

लेखकः

कल्याण इनामदार

चित्रकार :

राहुल देशपांडे

ISBN :

978-81-7925-094-5

आवृत्ती :

पहिली आवृत्ती २००३

पाने :

40

पुनर्मुद्रण:

दुसरी आवृत्ती २०२४

40.00

About the book

वयोगट ३+

प्राण्यांची गाणी म्हणता म्हणता मुलांना सगळ्या प्राणी-पक्ष्यांची ओळखही होईल.

गेंडा –

नाकावरती शिंग उगवले

भला थोरला जबडा

मातकट काळा गेंडा असतो

ताकद्वाला तगडा.

सुतार –

सुतार पक्ष्याची चोचीने

झाडावरती टकटक चाले

टकटकताना लाल तुऱ्यासम

डोक्यावारली टोपी हाले