माझ्या आवडत्या गोष्टी
| लेखक : | राजा मंगळवेढेकर |
|---|---|
| चित्रकार : | संजय पांडे |
| आवृत्ती : | पहिलीआवृत्ती 2001, दुसरी आवृत्ती 2012, दुसरे पुनर्मुद्रण 2024 |
| पाने : | 96 |
| ISBN: | 978-81-7925-316-8 |
₹140.00
About the book
वयोगट १० +
संतांबद्दल बोलताना बहुतेक वेळा आपण त्यांनी केलेल्या चमत्कारांचाच उल्लेख करतो. पण त्या पलिकडे जाऊन संतांचे विचार, उच्च उदात्त शिकवणुकीकडे मुलांचे लक्षं वेधावे या हेतूने लिहिलेल्या, काळ, देश, धर्म यांच्यापलीकडे जाऊन पिढ्यान्पिढ्या परंपरेने चालत आलेल्या, आजही टिकून असलेल्या आणि तेवढ्याच आवडीने ऐकल्या आणि वाचल्या जाणार्या या गोष्टी.
`लीची’ ही चिनी कथा, `प्रार्थना’ ही रशियन कथा, `जगणं’ ही इजिप्शियन गोष्ट, मोरोक्को देशातली `एका नदीची गोष्ट’, हिमालयाच्या कुशीतली `दावाची गोष्ट’ अशा निरनिराळ्या ठिकाणच्या गोष्टींबरोबरच `गाडगेबाबा’ यांच्यापासून आधुनिक संतांपर्यंतच्या गोष्टीही राजा मंगळवेढेकरांनी खास आपल्या शैलीत सांगितल्या आहेत.
जगातल्या विविध धार्मिक विचारधारांचे प्रतिनिधीत्व करणार्या तसेच समाजाच्या हितासाठी झटणार्या या संत-सज्जनांच्या कथा तुमच्या मुलांना नक्कीच आवडतील.









