अध्ययन अक्षमता आणि मुले240
| लेखकः | ओनीता नाक्रा |
|---|---|
| अनुवाद : | शारदा बर्वे |
| ISBN : | 978-81-7925-431-8 |
| आवृत्ती : | पहिली आवृत्ती 2015, पुनमुद्रण 2017 |
| पाने : | 198 |
Original price was: ₹300.00.₹240.00Current price is: ₹240.00.
About the book
लेखन, वाचन व इतर अभ्यास याबाबतच्या शाळेच्या अपेक्षा काही मुले पुऱ्या करू शकत नाहीत. शिक्षणाच्या पारंपरिक चौकटीत यशस्वी होऊ न शकलेल्या या मुलांना आणि प्रौढांना समाज पटकन दोषी धरतो. मात्र खरी गरज असते ती त्यांच्यातील क्षमतांना असणाऱ्या मर्यादांसह त्यांच्याकडे डोळसपणे पाहण्याची. मानसशास्त्रातील (Psychology) आणि मज्जामानसशास्त्रातील (Neuropsychology) प्रगतीने आपल्याला ‘मानसा’कडे आणि त्यामुळेच ‘माणसाकडे’ पाहण्याची एक नवीन दृष्टी बहाल केली आहे, त्यामुळे हे आता शक्य झाले आहे.
या मुलांना कोणत्या अडचणी येतात, त्या कशामुळे येतात व आपण त्यांना कशी मदत करू शकतो यांचे विस्तृत विवेचन या पुस्तकात केले आहे.
पालक, शिक्षक, शिक्षक, शिक्षणक्षेत्रातील पदाधिकारी, मानसशास्त्राचे अभ्यासक, रेमेडिअल टीचर्स अशा सर्वांसाठी हे पुस्तक उपयोगी आहे.









