मिलिंद मुळीक
मिलिंद मुळीक आणि वॉटरकलर हे एक अतूट समीकरण आहे. वयाच्या पाचव्या वर्षापासून चित्रकलेची आवड असणाऱ्या मिलिंद मुळीक यांनी तेराव्या वर्षी वॉटरकलरमध्ये लॅण्डस्केप्स करायला सुरुवात केली. वॉटरकलरबरोबरच ॲक्रॅलिक, पेस्टलसारख्या इतर माध्यमांमध्येही त्यांनी काम केलं आहे. परंतु त्यांचे मुख्य प्रेम आहे ते वॉटरकलरवरच. आज ते वॉटरकलर या माध्यमातले जागतिक दर्जाचे एक महत्त्वाचे कलावंत मानले जातात. कागदावर जलरंगात अत्यंत वेगाने काम करण्यात त्यांचा हातखंडा आहे. तंत्रकौशल्य आणि सर्जनशीलता यांचा सुंदर मिलाफ त्यांच्या चित्रांमधून झालेला दिसतो.
फ्रान्स, इटली, स्वीडन, रशिया, दुबई, हाँगकाँग, मलेशिया, सिंगापूर इ. अनेक देशांतील वॉटरकलर संदर्भात काम करणाऱ्या संस्थांनी त्यांना प्रात्यक्षिकांसाठी मानाने बोलावले आहे. या सर्व देशात त्यांच्या चित्रांची प्रदर्शनेही झाली आहेत. जागतिक पातळीवरच्या निवडक चित्रांच्या प्रदर्शनातून त्यांची चित्रं मांडली गेली आहेत. भारतात व भारताबाहेर त्यांच्या चित्रांची पन्नासपेक्षा जास्त प्रदर्शने झाली आहेत.
वॉटरकलर हे त्यांचे पहिले पुस्तक 2000 साली मराठी व इंग्रजी अशा दोन भाषांत प्रकाशित झाले. आजवर दोन्ही भाषांत मिळून या पुस्तकाच्या एक लाखापेक्षा जास्त प्रती विकल्या गेल्या. त्यांची एकंदर तेरा पुस्तके प्रकाशित झाली व त्या सर्व पुस्तकांना प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.
त्यांनी वॉटरकलरचा स्वतःचा कोर्स विकसित केला आहे. विद्यार्थीवर्गातही ते खूप प्रसिद्ध आहेत.
-
Sale!

ओपेक कलर
Original price was: ₹150.00.₹120.00Current price is: ₹120.00. -

पर्स्पेक्टिव्ह
₹0.00 -
Sale!

पेन्सील टेक्निक्स – २
Original price was: ₹225.00.₹180.00Current price is: ₹180.00. -

मिलिंद मुळीक ऍट होम
₹80.00 -
Sale!

वॉटरकलर डेमॉन्स्ट्रेशन्स
Original price was: ₹140.00.₹112.00Current price is: ₹112.00. -

वॉटरकलर लॅन्डस्केप्स (स्टेप बाय स्टेप)
₹0.00 -

स्केचबुक
₹0.00








