वायू नायडू

वायू नायडू

वायू नायडू या भारतीय वंशाच्या ब्रिटिश कथाकार आणि लेखक आहेत. त्या कथाकथनही करतात.
त्यांच्या मौखिक व लिखित कथांच्या विषयात वैविध्य आढळते. स्थलांतरितांच्या, शहरी, लोककथा, आदिवासी कथांपासून महाकाव्यांपर्यंत कथा विस्तार त्यांच्या लिखाणात आढळतो. मुख्यत्वे साहित्यिक आणि लोकपरंपरा यांच्या प्रेरणा त्यांच्या कथांमागे असतात.
सांस्कृतिक सीमांच्या पलीकडे राहाणाऱ्या लोकांना ओळख मिळवून देणे हे त्यांच्या लेखनाचे वैशिष्ट्य आहे. त्यांना 1994 मध्ये मौखिक परंपरा या विषयासंदर्भातील पीएचडी पदवी मिळाली आहे. ‘सीता’ज् असेंट’ आणि ‘अंडर द बनयाम’ ही पुस्तके विशेष प्रसिद्ध आहेत.
भारतातल्या विविध लोककथा त्यांनी गोष्टीरूपात मांडल्या आहेत. ‘जादूची भांडी’ ही तामिळनाडूमधील लोककथा आहे. तामिळनाडूच्या अय्यनार पद्धतीने काढलेली चित्रे पुस्तकामध्ये आहेत.
तर वाकडे शेपूट ही बिहारी लोककथा आहे. यातली चित्रं लोकप्रिय मधुबनी शैलीवर आधारलेली आहेत. उत्तर बिहारमधल्या स्त्रिया अशी चित्रं काढतात. या शैलीचा सुंदर वापर या पुस्तकात केला आहे.