शि. द. फडणीस

शि. द. फडणीस यांचं पूर्ण नाव शिवराम दत्तात्रेय फडणीस. त्यांचा जन्म बेळगाव जिल्ह्यातील भोज तालुक्यात २९ जुलै १९२५मध्ये झाला.
त्यांनी मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण कोल्हापूरला पूर्ण केले, त्यानंर सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टस् मुंबई इथून कलाशिक्षणातील पदविका अभ्यासक्रम १९४९मध्ये पूर्ण केला.

हसरी गॅलरी (Laughing Gallery) या त्यांच्या हास्यचित्रांच्या प्रदर्शनांचे देशात तसेच परदेशातही आजवर पन्नास प्रयोग झाले असून सर्वच प्रयोगांना रसिकांचा उदंड प्रतिसाद मिळाला आहे. सुरुवातीच्या तीन-चार प्रयोगांनंतर लोकांच्या आग्रहास्तव ही हसरी गॅलरी (Laughing Gallery) पुस्तक रूपाने प्रकाशित झाली व हे पुस्तक आजही लोकांच्या पसंतीस उतरत आहे.

त्यांना कॅग म्हणजेच कमर्शिअल आर्टिस्टस् गिल्ड पुरस्कार, शं. वा. किर्लोस्कर पुरस्कार, महाराष्ट्र सेवा संघ कलाकार पुरस्कार तसंच इंटरनॅशनल लॉन्जिटिव्हीट सेंटर, इंडिया यांच्या वतीनं जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
त्यांच्या व्यंगचित्रांमधून लोकांच्या चेहऱ्यावर हसू फुलते.