डाग चालायला लागला

चित्रकार :

कनुप्रिया कुलश्रेष्ठ

पाने :

20

आवृत्ती :

प्रथम आवृत्ती 2026

ISBN:

978-81-994162-3-9

₹110.00

पुस्तकाबद्दल

काही गोष्ट ठरावीक प्रकारेच होतात, अशी आपली लहानपणापासूनच मनोधारणा पक्की झालेली असते. या मनोधारणा म्हणजे जणू अव्यक्त सामाजिक नियमच असतात. ते नियमच योग्य व अयोग्य वर्तन कोणते, तसेच काय करावे व काय करू नये, हे ठरवतात. खूप कमी लोक असे प्रचलित नियम मोडून वेगळ्या पद्धतीने विचार करून वागण्याचा प्रयत्न करतात.  ‘डाग चालायला लागला’ या पुस्तकात अशीच काहीतरी नवीन, वेगळं करण्याची गोष्ट आहे. मुलांशी विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी याचा उपयोग होऊ शकतो. जसे, विविध दृष्टीकोनांबद्दल आदर बाळगणे, आपल्या संकुचित आरामदायी जगातून बाहेर येणे, इतरांपेक्षा वेगळे असूनही त्याबद्दल सहजता वाटणे व नवनवीन कल्पना राबवण्याच्या भीतीपासून मुक्त असणे.