मुलांचे ग्रंथालय
| संपादनः | मंजिरी निंबकर |
|---|---|
| छायाचित्रे | वसीम मणेर |
| ISBN : | 978-81-7925-589-6 |
| आवृत्ती : | पहिली आवृत्ती मे 2019, पुनर्मुद्रण 2024 |
| पाने : | 86 |
₹125.00
About the book
राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्याने २००५मध्ये पुस्तके आणि ग्रंथालयांचे लहान मुलांच्या आयुष्यातील महत्त्व अधोरेखित केले. बालसाहित्य वापरून मुलांमध्ये वाचनाबद्दल प्रेम निर्माण करण्याचं कौशल्य ग्रंथपालांमध्ये, शिक्षकांमध्ये, आणि पालकांमध्येही विकसित व्हायला हवे.
मुलांना प्रश्न विचारण्याचे, स्वतंत्र विचार करण्याचे, कल्पनेच्या भराऱ्या घेण्याचे स्वातंत्र्य ग्रंथालयातच मिळू शकते. मुलांची पुस्तकांशी दोस्ती व्हावी, त्या माध्यमातून त्यांनी जगाशी नाते जोडावे याकरता ही मार्गदर्शक पुस्तिका. यात काही ग्रंथालय कृती व उपक्रम दिलेले आहेत, तसेच काही अनवट प्रयोगांचे दाखलेही यात मिळतील.









