कल्याण इनामदार
कल्याण इनामदार आकाशवाणी आणि दूरदर्शन यांचे मान्यताप्राप्त कवी होते. त्यांची जवळपास पाऊणशे पुस्तके प्रकाशित आहेत. कविता हा त्यांचा ध्यास आहे. गेली चाळीस वर्ष ते सातत्याने दर्जेदार लेखन करत आहेत.
त्यांचा पहिला कविता संग्रह ‘अबोलीची नक्षी’ 1972साली प्रकाशित झाला. बालकवितांची पंचेचाळीस पुस्तके प्रसिद्ध आहेत. धमाल गाणी, गाणारे गाल यांसारख्या पुस्तकांमध्ये छोट्याचे भावविश्व त्यांनी शब्दबद्ध केले आहे.





