डॉ. कीर्ती मुळीक

डॉ. कीर्ती मुळीक

एम.ए., सेट, एम.फिल., पीएच.डी. (मराठी)

पीएच.डी. प्रबंधाचा विषय – ‘मराठी ग्रामीण साहित्याची चळवळ – प्रेरणा आणि परिणती’

त्यांचे वडील ज्येष्ठ मराठी साहित्यिक आणि मराठी ग्रामीण साहित्य चळवळीचे प्रवर्तक डॉ . आनंद यादव यांनी १९७५पासून १९९०पर्यंत जी ग्रामीण साहित्याची चळवळ अविरतपणे संपूर्ण महाराष्ट्रात चालवली, त्या चळवळीचा प्रेरणेपासून ते परिणतीपर्यंतचा लेखाजोखा या प्रबंधात मांडला आहे. ‘ग्रामीण साहित्याची चळवळ – प्रेरणा आणि परिणती’ या नावाने हा प्रबंध ग्रंथरुपाने प्रकाशित झाला आहे.

सध्या कीर्ती मुळीक पुण्यातील सर परशुरामभाऊ महाविद्यालय अर्थात एस.पी. कॉलेजमध्ये अध्यापन करत आहेत. विद्यार्थीप्रिय प्राध्यापक म्हणून नावलौकिक प्राप्त. तत्पूर्वी कॅम्प एज्युकेशन सोसायटीच्या डॉ. अरविंद ब. तेलंग वरिष्ठ महाविद्यालयात मराठी विभागप्रमुखपदी २० वर्षे कार्यरत.

कथासंग्रह, ललितलेखसंग्रह, समीक्षा आणि बालवाङ्मय या साहित्यप्रकारांत एकूण १०पेक्षा अधिक पुस्तके प्रकाशित.

‘आदर्श शिक्षक’, ‘क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले’ पुरस्कारांनी सन्मानित. ‘डॉ. आनंद यादव : एक साहित्यिक प्रवास’ या ग्रंथाला आपटे वाचन मंदिर, इचलकरंजी यांचा उत्कृष्ट मराठी ग्रंथ साहित्य पुरस्कार प्राप्त.

‘भि.ग. रोहमारे पुरस्कार (२०१८) – उत्कृष्ट ग्रामीण साहित्य निर्मिती’, ‘डॉ. आनंद यादव : एक साहित्यिक प्रवास’ या ग्रंथाला प्राप्त.

प्रा. विजयाताई कुऱ्हे, श्रीरामपूर साहित्य जीवनगौरव पुरस्कार (२०१९) ‘साहित्य: स्वरूप आणि विकास’ या ग्रंथाला प्राप्त.

साहित्यप्रेमी भगिनी मंडळाच्या कार्यकारिणी सदस्य, स्त्री साहित्य संमेलन, समरसता साहित्य संमेलन इत्यादीमध्ये सहभाग.