मंजुश्री गोखले

मंजुश्री गोखले

मंजुश्री गोखले यांचा जन्म 21 नोव्हेंबर 1957 रोजी झाला. त्या इचलकरंजीच्या मॉडर्न हायस्कूलमध्ये शिक्षिका होत्या आणि नंतर त्या कोल्हापूरला गेल्या. तेथील महाराष्ट्र कॉलेजमधून त्या उपप्राचार्य म्हणून निवृत्त झाल्या.
त्यांची एकंदर 25 पुस्तके प्रकाशित झाली आहेत. कविता, कादंबरी, पाकशास्त्र, प्रवास वर्णन अशा विविध प्रकारांत त्यांनी लेखन केले आहे.
चिन्ना या पुस्तकामध्ये चिन्नाचा खोडकर स्वभाव चितारला आहेच, मात्र त्याच्या  चौकस, हुशार स्वभावामुळे धाडसी कामगिरी दाखवली आहे.