किरण पुरंदरे

गेली ३० वर्षं निसर्ग आणि पर्यावरण या क्षेत्रात अभ्यासक, रक्षक, शिक्षक, प्रेरक आणि लेखक म्हणून काम केले आहे. निसर्गाचा अभ्यास, जतन आणि संवर्धन यासाठी पुरंदरे यांनी अवघं आयुष्य वाहिलेलं आहे.

महाराष्ट्र शासनातर्फे पुणे जिल्ह्यासाठी मानद वन्यजीव रक्षक म्हणून त्यांची नियुक्ती झाली आहे.

त्यांची प्राणी, पक्षी, जैविक विविधता इ. विषयांवर १२ पेक्षा जास्त पुस्तके प्रकाशित आहेत. पैकी आभाळवाटांचे प्रवासी आणि सखा नागझिरा या पुस्तकांना महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट वाङमयनिर्मिती पुरस्कार मिळालेला आहे.

नागझिरा अभयारण्यात सलग ४०० दिवस मुक्काम करून त्यांनी अभ्यास केलं आहे.

कोणत्याही कृत्रिम साधनाशिवाय भारतातील सुमारे ७० पक्ष्यांच्या आवाजांच्या नकला करून त्यातील काहींचा प्रतिसाद मिळवण्याचे कौशल्य पुरंदरे यांच्याकडे आहे.

सध्या नागझिरा अभयारण्याच्या परिसरात नैसर्गिक पाणवठयांचे जतन, निसर्ग शिक्षण, संशोधन आणि निसर्ग संवर्धनाची अनेक कामे किरण पुरंदरे करत आहेत.