राजा मंगळवेढेकर

जन्म ११ डिसेंबर १९२५
मृत्यू १ एप्रिल २००६

मराठी बालसाहित्यामध्ये राजा मंगळवेढेकर यांचं नाव आदराने घेतलं जातं. स्वातंत्र्यचळवळीत सक्रिय सहभाग घेत असताना त्यांना साने गुरुजींचा सहवास लाभला. यातूनच त्यांना मुलांसाठी लिहिण्याची प्रेरणा मिळाली. आजवर मंगळवेढेकरांनी विपुल साहित्यनिर्मिती केली आहे. यामध्ये २०० पेक्षा जास्त गोष्टी, कथा, कविता, चरित्र, पत्रं आणि विज्ञान व पर्यावरण याविषयीची पुस्तकं आहेत. ‘आपला भारत’, ‘शोध भारताचा’ या त्यांच्या गाजलेल्या पुस्तकमालिका असून त्यांनी लिहिलेलं साने गुरुजींचं चरित्रदेखील प्रसिद्ध आहे. राष्ट्रसेवा दल, साने गुरुजी कथामाला, आंतरभारती इत्यादी सांस्कृतिक कार्य करणाऱ्या संस्थांशीही त्यांचा निकट संबंध होता.

जवाहरलाल नेहरू समिती पुरस्कार, गदिमा पुरस्कार, बालसेवा पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलं आहे. त्यांनी पुणे येथे १९८५ साली झालेल्या सहाव्या बालकुमार साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविले आहे.