राजीव तांबे
राजीव तांबे गेली अनेक वर्षं सातत्याने मुलांसाठी काम करत आहेत. मुलांना आनंददायी शिक्षण मिळावे व त्यांच्या कल्पनाशक्तीला, सर्जनशीलतेला वाव मिळावा यासाठी ते शिक्षक तसेच पालकांच्या कार्यशाळा, कार्यक्रम घेतात. त्यांचे पालकांना मार्गदर्शन करणार्या लेखांचे ‘छोटीसी बात’ हे पुस्तक तसेच ‘गंमतशाळा’ हे वैज्ञानिक प्रयोगावर आधारित पुस्तक विशेष गाजले आहे. याशिवाय मुलांसाठी त्यांनी गाणी-कविता-गोष्टी लिहिल्या आहेत. आजवर त्यांची शंभरपेक्षा जास्त पुस्तके प्रसिद्ध झाली असून त्यातील काही पुस्तकांची भारतातल्या व भारताबाहेरच्याही विविध भाषांत भाषांतरे झाली आहेत. ते लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स सारख्या अग्रगण्य दैनिकांमधून ते स्तंभलेखनही करतात.
काही स्वयंसेवी संस्थांसाठी आणि युनिसेफसाठी शिक्षण सल्लागार म्हणून कार्यरत असताना महाराष्ट्रातील अनेक शाळांना त्यांनी भेटी दिलेल्या आहेत. तेथील शिक्षकांच्या कार्यशाळा घेतल्या आहेत. वर्गातील मुलांशी संवाद साधत गृहभेटी दिल्या आहेत. जिथे एसटी जात नाही अशा दुर्गम प्रदेशातील आणि वाडी-वस्त्यांवरील शाळांचाही त्यात समावेश आहे. श्रोत्यांशी संपर्क साधण्याच्या त्यांच्या मैत्रीपूर्ण संवादात्मक शैलीमुळे श्रोत्यांची व त्यांची नाळ लगेच जुळते.
लेखातून, गोष्टींमधून, कार्यशाळा तसेच टीव्ही शोजमधून मुलांना, त्यांच्या भावविश्वाला समजून घेण्याची त्यांची धडपड दिसून येते. सोप्या-साध्या शैलीमुळे व अद्भुत कल्पनारम्य गोष्टींमुळे त्यांचे लिखाण मुलांना आवडते.
-
Sale!

सुलभ महाभारत
Original price was: ₹175.00.₹140.00Current price is: ₹140.00. -
Sale!

हरीचा पतंग
Original price was: ₹90.00.₹72.00Current price is: ₹72.00. -

वॉटरकलर लॅन्डस्केप्स (स्टेप बाय स्टेप)
₹0.00 -
Sale!

स्टिल लाइफ
Original price was: ₹160.00.₹128.00Current price is: ₹128.00. -
Sale!

पक्षी – आपले सख्खे शेजारी
Original price was: ₹350.00.₹280.00Current price is: ₹280.00. -
Sale!

Leela and the Butterfly
Original price was: ₹110.00.₹88.00Current price is: ₹88.00. -
Sale!

Varanasi – An artist’s impression
Original price was: ₹200.00.₹160.00Current price is: ₹160.00. -
Sale!

The Magic Shop
Original price was: ₹80.00.₹64.00Current price is: ₹64.00. -
Sale!

Expressions In Watercolour
Original price was: ₹550.00.₹440.00Current price is: ₹440.00. -
Sale!

WATERCOLOUR
Original price was: ₹625.00.₹500.00Current price is: ₹500.00. -
Sale!

Nick’s Deathly Wishes
Original price was: ₹80.00.₹64.00Current price is: ₹64.00.










