सुषमा सामंत
सुषमा सामंत यांनी मुंबई विद्यापीठातून इंग्रजी साहित्यात बी. ए. करून नंतर ‘मास्टर ऑफ ॲड्मिनिस्ट्रेटीव मॅनेजमेंट’ ही पदवी प्राप्त केली आहे. तसेच त्यांनी ‘राष्ट्रभाषा पंडित’ पदवी प्राप्त केली आहे. रशियन भाषेत ॲड्व्हान्सड् डिप्लोमा केल्यानंतर मास्कोमध्ये रशियन भाषा शिक्षकाचे प्रशिक्षणही घेतले आहे.
एअर इंडियात विविध पदांवर 25 वर्षे कार्यरत राहिल्यानंतर त्यांनी एअर इंडिया दुबई एअरपोर्ट मॅनेजर या पदावर असताना स्वेच्छानिवृत्ती घेतली. त्यांनी अनेक वर्षे रशियन भाषा शिकवली आहे, तसेच अनुवाद आणि दुभाष्याचे कामही केले आहे.
स्वेच्छानिवृत्तीनंतर त्यांनी विविध सामाजिक संस्थांतर्फे मराठी भाषा विकास वर्ग व इंग्रजी संभाषण वर्ग घेतले आहेत. त्यांना वाचनाची, शिकण्याची आणि शिकवण्याची आवड आहे.

