श्रीकांत बोजेवार

मराठीतील वरिष्ठ पत्रकार, संपादक, चित्रपट समीक्षक, स्तंभ लेखक अशी त्यांची ओळख आहे. त्याशिवाय चित्रपटांसाठी कथा, पटकथा, संवाद, गीते त्यांनी लिहीली आहेत.

सुरुवातीला चित्रपट समीक्षक आणि पुढे त्या सोबतच रविवार पुरवणी संपादक, सहसंपादक, निवासी संपादक अशा विविध पदांवर ते गेली ३२ वर्षे काम करत आहेत.

‘सकाळ’, ‘लोकसत्ता’ आणि ‘महाराष्ट्र टाइम्स’ या मराठीतील प्रमुख वृत्तपत्रांत त्यांनी अशा विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत.

‘तंबी दुराई’ या नावाने ते गेली २६ वर्षे राजकीय-सामाजिक-सांस्कृतिक उपहासात्मक सदर लिहित आहेत. 

कथा, कादंबरी, बालकथा, चित्रपट पटकथा, गाणी, ललित लेख असे विविधांगी आणि गंभीर तसेच गंमतीदार लेखन ते करतात. त्यांची आजवर १५ पुस्तके प्रकाशित झाली आहेत.