शमीम पदमसी

शमीम पदमसी

शमीम पदमसी या लेखिका आहेत, शिवाय त्या विविधांगी जबाबदाऱ्यांमध्ये गुंतलेल्या आहेत. त्या शिक्षणतज्ज्ञ, सामाजिक कार्यकर्त्या, राजकीय मुत्सद्दी आहेत. त्या आजीदेखील आहेत.
त्यांना बालसाहित्यामध्ये खूप रुची असून, पुस्तके ही शिकण्याची साधने असतात यावर त्यांचा गाढ विश्वास आहे. त्या मुंबईच्या रहिवासी असून, जगभरातल्या विविध जागांना भेट देऊन तेथील संस्कृती, खाद्यपदार्थ यांचा आस्वाद घ्यायला त्यांना आवडते.