संध्या केतकर

संध्या केतकर

 

सौ. संध्या शरद केतकर यांचा जन्म मुंबई येथे २७ ऑक्टोबर १९५५ साली झाला. त्या चित्रकलेतील पदव्युत्तर पदवीप्राप्त असून, नेट परीक्षा उत्तीर्ण झाल्या आहेत. बी.ए. व एम.ए. परीक्षेत चित्रकला विषयात सर्वोच्च गुण मिळवल्याबद्दल अनुक्रमे ‘प्रिन्सिपल पुरस्कार’ व ‘चान्सलर पुरस्कारा’च्या त्या मानकरी आहेत. सध्या मुंबईमधील श्री.ना.दा.ठाकरसी महिला विद्यापीठामधे त्या चित्रकला विभागप्रमुख म्हणून कार्यरत आहेत.

कलाशिक्षक म्हणून काम करत असताना त्यांनी आपला चित्रकलेचा छंदही उत्तमरीत्या जोपासला आहे. १९९१ साली त्यांचे पहिले स्वतंत्र प्रदर्शन झाल्यानंतर देशविदेशात त्यांची चित्रे पोचली आहेत.

श्री.ना.दा.ठा. महिला विद्यापीठातील लायब्ररी, कामगार नगर मंदिर कुर्ला आणि इतर खाजगी संग्रहालयात त्यांची चित्रे संग्रहित केली आहेत.

त्यांनी भारतीय व पाश्‍चात्त्य कलांविषयी अभ्यासपूर्ण लेखनही केले आहे. चित्रकलेचे विविध अभ्यासक्रम तयार करण्यात त्यांचा सहभाग आहे.