समीर दिवाणजी
हॉटेल मॅनेजमेंट विषयात एम.बी.ए व पी.एच.डी मिळवलेल्या समीर दिवाणजी यांचं शिक्षण पुणे, बंगळुरू आणि मुंबई या तीन शहरात झाले. याच क्षेत्रात त्यांनी भारतात पुणे, मुंबई, बंगळुरू, चंदीगढ आणि परदेशात श्रीलंका व मालदिव्जमध्ये कामाचा अनुभव घेतला.
कलासक्त समीरजींना साहित्य, नाटक, चित्रपट या साऱ्याची आवड आहे. वाचनाप्रमाणे ते लिखाणातही रमतात. संगीत भारतीय असो वा पाश्चात्य, ते त्यांना नेहमीच भुरळ घालतं.
निसर्गाबद्दल वाटणारी ओढ त्यांना ट्रेकिंग आणि वनभटकंतीला घेऊन जाते. प्रवासादरम्यान नव्या स्थळांना भेटी देणे त्यांना आवडतं. योगसाधनेचीही त्यांना आवड आहे; केवळ सराव नाही तर त्याविषयी त्यांचं वाचनही कायम सुरू असतं.
सातत्याने नव्या गोष्टी शिकण्यासाठी आणि त्या आत्मसात करण्यासाठी ते प्रयत्नशील असतात. मुलांच्या दुनियेत रमायला, त्यांच्याशी गप्पा मारायला त्यांना खूप आवडतं.

