रत्नाकर महाजन
रत्नाकर महाजन हे एअर इंडियामध्ये असिस्टंट जनरल मॅनेजर या पदावर काम करत होते. निवृत्तीनंतर त्यांनी वैमानिक कला (Aviation) या विषयावर मराठीत पुस्तके लिहिली. पहिल्या पुस्तकात त्यांनी एअर इंडियाचा इतिहास शब्दांकित केला. त्यांनतर त्यांनी महत्त्वाच्या वैमानिकांची छोटेखानी चरित्रदेखील लिहिली.
महाजन यांनी कवितादेखील लिहिल्या आहेत. त्यांच्या काही कविता अमेरिकेतल्या प्रथितयश प्रकाशकांनी प्रकाशित केल्या आहेत. त्यांची ‘Terrorism’ ही कविता अमेरिकेतल्या International Library of Poetry तर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या ‘The Best Poets and Poems of 2005’मध्ये प्रकाशित झाली आहे.
याशिवाय ते शाळा तसेच विविध ठिकाणी ओरिगामीच्या कार्यशाळाही घेतात.

