राजेश लवळेकर

राजेश लवळेकर पुण्याचे रहिवासी आहेत. अभिनव कला महाविद्यालयातून त्यांनी उपयोजित कला शाखेची पदवी घेतली. ते एक लोकप्रिय मराठी चित्रकार, लेखक आणि चित्र-कथाकार आहेत.

लहान मुलांसाठी सचित्र गोष्टींची पुस्तके त्यांनी लिहिली आहेत. चित्रमय पंचतंत्र, चित्रमय इसापनीती, चित्रमय बुडबुड घागरी, चित्रमय कावळ्याला लागली तहान ही त्यांची पुस्तके मुलांमध्ये खूप लोकप्रिय आहेत. या पुस्तकांतील चित्रे रंगीत आणि आकर्षक आहे.