चोरी

Sale!
संपादन :

माधुरी पुरंदरे

चित्रकार :

भार्गवकुमार कुलकर्णी

पाने :

16

आवृत्ती :

पहिली आवृत्ती

पुनर्मुद्रण :

पुनर्मुद्रण 2023

ISBN:

978-93-93381-02-6

Original price was: ₹75.00.Current price is: ₹60.00.

पुस्तकाबद्दल

मराठीतील नामवंत साहित्यिकांच्या, मुलांना आवडतील अशा गोष्टी, चित्रमय पुस्तकांच्या स्वरूपात. 

गोपू चालत चालत खूप लांबवर आला. तेथे अद्याप न कापलेले एक शेत उभे होते. भाताच्या ओंब्यानी गच्च भरलेले, वाऱ्यावर डुलणारे आणि त्यावर पोपटांचे थवे भरारत होते.

लांब शेपट्यांचे हिरवेगार पोपट पलीकडच्या झाडीतून बाणासारखे धावत येत आणि त्या शेताला भिडत. चोचीत एकेक ओंबी पकडून पुन्हा माघारी जात.