वीरधवल (संक्षिप्त आवृत्ती)

लेखक :

(नाथमाधव) द्वारकानाथ माधव पितळे

संक्षिप्तीकरण :

डॉ. कल्याणी हर्डीकर

पाने :

136

आवृत्ती :

पहिली आवृत्ती

ISBN:

978-81-7925-575-9

125.00

About the book

कुमारवयीन हुशारबुद्धिमान मुले मनात आणले तर आपल्या राष्ट्रासाठी का करू शकतातकशी लढू शकतातयेणाऱ्या संकटांवर न डगमगता उत्तम संस्कारांमुळे कशी मात करू शकतात याचे उत्तम उदाहरण म्हणजे वीरधवलचे व्यक्तिचित्रण आहेएकशे पाच वर्षांपूर्वी नाथमाधवांनी हा वीरधवल रंगवला आहे.

वीरधवलच्या आयुष्यातही अनेक अद्भुतरम्य प्रसंग आहेततो पोरका आहेनितीचण्डवर्म्यासारख्या बलाढ्य शत्रूशी त्याची जन्मतःच गाठ घालून देतेपणकीर्तीवर्म्याचे पिशाच्च वीरधवलची कशी पाठराखण करते आणि तो आपल्या नियोजित कार्यात कसा शस्वी होतोहे मुळातूनच वाचाला हवे.

मूळ कादंबरीचा संक्षेप कथानकाचा मूळ प्रवाह काम ठेवूनच केला आहेनाथमाधवांचीच भाषा वापरली आहेमुलांची साहसी वृत्ती वाढावीत्यांची अद्भुताची आवडही भागवली जावीदुष्कृत्यांचा आणि दुर्जनांचा शेवट दुःखाचा होतो आणि सुजनांचा शेवट कितीही कठीण प्रसंगांना तोंड द्यावे लागले तरी सुखाचा होतोहे त्यांच्या मनावर नोंदवले जावेहा उद्देश ठेवून नाथमाधवांनी जे लिहिलेतेच मुलांपुढे पोचवाचा प्रत्न केला आहेमानवी स्वभावांच्या परिपोषाला प्राधान्य दिले आहे आणि अतिरंजित अद्भुताला फाटा दिला आहे.