सुलभ शालेय गणित – भाग 3 गुणोत्तर, प्रमाण आणि समीकरणे

Sale!
संपादनः

सु. च. आगरकर, हे. चिं. प्रधान, र. म. भागवत, अरविंद कुमार
(होमी भाभा विज्ञान संस्था)

ISBN :

978-81-7925-459-2

आवृत्ती :

पहिली आवृत्ती ऑगस्ट 2016

पाने :

136

Original price was: ₹100.00.Current price is: ₹80.00.

पुस्तकाबद्दल

शालेय गणित सोप्या पद्धतीने शिकवणारे आणि त्याची भीती घालवणारे पुस्तक.

गणित हा विषय शाळेतल्या भाषा, सामाजिक शास्त्र या विषयांपेक्षा वेगळा असतो. प्रत्येक वर्षीचा अभ्यासक्रम मागच्या अभ्यासावर आधारलेला असतो. गणिताच्या अभ्यासात मागचा कुठलाही भाग कच्चा राहिला तर पुढचं सर्वच गणित कठीण होऊन बसतं.

होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्राने विकसित केलेल्या या चार पुस्तकांतून शालेय गणितातील सर्व अभ्यासक्रम सोपा करून मांडला आहे. या चार पुस्तकांच्या अभ्यासानंतर कोणत्याही विद्यार्थ्याला हा विषय कठीण वाटणार नाही असा विश्वास वाटतो.

या तिसऱ्या भागात गुणोत्तर, प्रमाण व चलन, गुणोत्तर व प्रमाणाचे उपयोजन, समीकरणे, समीकरणांवरील व्यावहारिक प्रश्न, गुणोत्तरीय बैजिक राशी, गणित आणि भाषा या पाठांचा समावेश केला आहे.

शालेय गणिताचा अभ्यास करताना विद्यार्थ्यांबरोबरच, त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या पालक-शिक्षकांनाही हे पुस्तक उपयोगी ठरेल.