माधुरी पुरंदरे यांची चार नवीन पुस्तके
| लेखिका | माधुरी पुरंदरे |
|---|---|
| चित्रकार | माधुरी पुरंदरे आणि भार्गवकुमार कुलकर्णी |
| ISBN | 978-93-93381-86-6 |
Original price was: ₹410.00.₹369.00Current price is: ₹369.00.
About the book
माधुरी पुरंदरे यांची ही चार नवीन पुस्तके आता एका संचात उपलब्ध.
लहान मुलांना आवडतीलच. आणि मोठ्या माणसांना ‘लहान’ करतील !!!
नाही माहीत : लेखन आणि चित्रे माधुरी पुरंदरे
पाने 24, आकार: 8″ x 8″, रु. ११०/-
सकाळ झाली की अपूला खूप छान वाटतं. सगळं नवं नवं, ताजं दिसतं.
पण मग दुपार होते, नंतर संध्याकाळ होते आणि बघता बघता रात्र होते.
प्रत्येक वेळी अपूला काहीतरी वेगळं वाटतं.
पण का ते सांगताच येत नाही.
आता का? : लेखन आणि चित्रे माधुरी पुरंदरे
पाने12, आकार: 8″ x 8″, रु. ७५/-
पिटकूचं त्याच्या आईशी दिवसात एकदा तरी भांडण होतंच.
जणू भांडल्याशिवाय त्याला चैनच पडत नाही.
त्यालाही आणि आईलाही…
ही आहे प्रत्येक छोट्याची आणि त्याच्या आईची गोष्ट!
नदीवर – लेखन माधुरी पुरंदरे चित्रकार भार्गवकुमार कुलकर्णी
पाने:16 / आकार: 10.75″ x 8.5″, रु. १००/-
आई आणि दादा रोज नदीवर जातात. एक दिवस छोटा आकाशही त्यांच्याबरोबर गेला. केवढं पाणी! त्याच्या डोळ्यांत मावतच नव्हतं. सुरुवातीला आकाशला भीती वाटली. हळूहळू ती कमी व्हायला मदत झाली ती त्याच्या दादाची…कशी?
घोटाळा – लेखन आणि चित्रे माधुरी पुरंदरे
पाने 24, आकार:10.5″ x 8.5″, रु. १२५/-
सकाळ झाली असं कोंबड्यानं आरवून जाहीर केलं.
त्याआधीच घरातले सगळे आपापल्या कामाला लागले होते.
एका माशीला वाटलं, आपणही कामाला लागायला हवं.
नाहीतरी एका जागी स्वस्थ बसणं आपल्याला जमत नाहीच.
ती लगबगीनं निघाली अन् झाला नं घोटाळा !





