पूर्वा अग्रवाल

पूर्वा अग्रवाल

पूर्वा अग्रवाल यांनी अझीम प्रेमजी विद्यापीठातून शिक्षणशास्त्र विषयातील एम. ए ही पदवी प्राप्त केल्यानंतर लहान मुले वाचन व लेखन करायला कशाप्रकारे शिकतात, याचा अभ्यास केला आहे. याच दरम्यान त्यांचा भारतीय बालसाहित्याशी परिचय झाला.

मुलांसाठी लिहिलेले पहिले पुस्तक तुलिकातर्फे प्रकाशित झाल्यावर त्यांचे मुलांसाठी लेखन करण्याचे स्वप्न साकार झाले. वेगवेगळ्या कल्पनांना शब्द व चित्र या माध्यमातून उतरवण्याचे काम त्या करत असतात. सध्या त्या बंगलोर येथे आपल्या दोन मुलांबरोबर राहतात व एका शाळेत शिक्षण समन्वयक म्हणून काम करतात.