(नाथमाधव) द्वारकानाथ माधव पितळे

जन्म : ३ एप्रिल १८८२

मृत्यू : २१ जून १९२८

शिक्षण : मॅट्रिकपर्यंत.

व्यवसाय : मुंबई येथे जन्मलेल्या द्वारकानाथ पितळे यांनी कुलाब्यात तोफांचे गाडे बनवण्याच्या कारखान्यात काही काळ काम केले. ते ‘नाथमाधव’ या टोपणनावाने लेखन करीत.

लेखन प्रकार : कादंबरी : सायंकालचा माणूस, प्रेमवेडा, हेमचंद्र आणि रोहिणी, विहंगवृंद, सुवासिनी, राया क्लब उर्फ सोनेरी टोळी, गृहदशेचा फेरा, प्रेम आणि सूड, दोन भावंडे, दैवाचा खेळ, देशमुखवाडी, विमलेची गृहदशा, डॉक्टर, सावळ्या तांडेल, स्वराज्याचा श्रीगणेशा या कादंबर्‍या १९२१ ते १९२० या काळात लिहिल्या.

विशेष : ते उत्तम गिर्यारोहक आणि शिकारी होते. सिंहगडावरील जंगलात शिकारीवर टेहळणी करताना त्यांचा कड्यावरून तोल गेला आणि त्यांना अपंगत्व आले. त्यानंतर ते लेखनाकडे वळले. जीवनाच्या अंतापर्यंत ते कादंबरी लेखन करत होते. त्यांच्या ‘डॉक्टर’ कादंबरीवर ‘शिकलेली बायको’ हा चित्रपट निघाला. तोही गाजला.