लक्ष्मण लोंढे

लक्ष्मण लोंढे

जन्म : १३ ऑक्टोबर १९४४ मृत्यू : १८ ऑगस्ट २०१५

शिक्षण : बी.एस.स्सी., एल.एल.एम.

अखिल भारतीय वित्तीय संस्थेत उच्चपदस्थ अधिकारी

साहित्यप्रकार : कथा, कादंबरी, प्रवासवर्णन, चरित्र

कथासंग्रह : पाण्यात राहणारा मासा, विज्ञानयात्रा, दुसरा आईन्स्टाईन

कादंबरी : देवांसि जिवे मारिले, आरण्यक आणि कोहम, गिनीपिग इत्यादी दहा कादंबऱ्या (यातील चार विज्ञानविषयक).

विशेष : विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात वाढीला लागलेल्या विज्ञानसाहित्यात महत्त्वाची भर घालणारे लेखक म्हणून ते ओळखले जातात.

पुरस्कार : त्यांची ‘दुसरा आईन्स्टाईन’ (१९८९) ही विज्ञानकथा ‘सायन्स टुडे’ या नियतकालिकात प्रसिद्ध झाली. या कथेला कन्सास विद्यापीठाचा ‘जागतिक सर्वोत्कृष्ट कथा पुरस्कार’ मिळाला. राज्यशासनाचा पुरस्कार व इतर पुरस्कार