रस्ता, प्रवास, पाऊस – स्वाती राजे (३ पुस्तकांचा संच)

लेखिका

स्वाती राजे

चित्रकार

चंद्रमोहन कुलकर्णी

वयोगट

८+

₹375.00

पुस्तकाबद्दल

रस्ता – कोकरू रोज कळपाबरोबर चरायला जाई. कुरणापलीकडे होते दाट रान.

काय असेल त्या रानापलीकडे? कोकरू रोज विचार करी.

एक दिवस त्याने ठरवले, या रानापलीकडे जायचेच!

पण काय होते त्या रानाच्या पलीकडे?…

प्रवास – कापणी करताना गव्हाचा एक दाणा उडाला थेट जमिनीवर. एकटाच!

आता आपलं काय होणार? या दुःखात त्याने डोळे मिटून घेतले…

आणि सुरू झाला त्याचा प्रवास… मातीपासून पुन्हा मातीपर्यंतचा, रुजून पुन्हा जगण्याचा…

पाऊस –

आनंदपूर गावात सगळे लोक सुखात राहायचे. हळूहळू पाऊस कमी झाल्याने

नदीचे पाणी अडवून तळे बांधायचे ठरले. पण तळ्याला नाव काय द्यायचे यावरून ठिणगी पडली आणि…

शेवटी राजू, रफिक, जसप्रीत आणि इतर मुलांची प्रार्थना ऐकून खुशीने बरसलेल्या पावसाची ही गोष्ट.

More like this