निलेश जाधव
जन्म – २३ सप्टेंबर १९७७
शिक्षण – जे. जे. इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाईड आर्टमधून उपयोजित कलेत (Applied Art) बीएफए (BFA).
निलेश जाधव हे एक व्यावसायिक चित्रकार आणि व्यंगचित्रकार आहेत. गेली २५ वर्ष ‘लोकसत्ता’ (इंडियन एक्सप्रेस ग्रुप) मध्ये चित्रकार आणि व्यंगचित्रकार म्हणून कार्यरत.
त्यांनी विविध टीव्ही चॅनल्स, चित्रपट आणि प्रकाशन संस्थांसोबत काम केले आहे. ते काही स्वयंसेवी संस्था आणि रस्त्यावरील मुलांसाठी, नियमितपणे कार्यशाळा आयोजित करत असतात. तसेच त्यांच्या पुस्तकांसाठी चित्रेही काढतात.
विविध शाळा आणि कला महाविद्यालयांसाठी सुद्धा ते चित्रकलेच्या कार्यशाळा आयोजित करतात.
त्यांच्या कामाला आजवर अनेक पुरस्कार मिळाले आहेत.

