श्रीनिवास विनायक कुलकर्णी

श्रीनिवास कुलकर्णी यांचा जन्म २० नोव्हेंबर १९३६ ला सांगली जिल्ह्यातल्या औदुंबर गावी झाला. सातवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी पुढील शिक्षण अनाथ विद्यार्थी आश्रम संस्थेत राहून पूर्ण केले.
त्यांचे आजोबा व वडील दोघेही चित्रकार होते. कुलकर्णी यांनी सुरुवातीला साइन बोर्ड पेटिंगचा व्यवसाय केला, तसेच ओगलेवाडीच्या काच कारखान्यात हिशेब खात्या नोकरी केली. त्यानंतर ते ‘मौज’ या नियतकालिकाचे संपादक म्हणून कार्यरत होते.
त्यांनी लहानपणी कविता लेखन केले होते. त्यांची पहिली मराठी कविता ‘बालसन्मित्र’ मासिकात प्रकाशित झाली. पुढे ललित लेखक म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली. पहिला ललित लेख १९६० साली ‘सत्यकथा’ मासिकात प्रकाशित झाला. ‘सोन्याचा पिंपळ’, ‘पाण्याचे पंख’, ‘कोरडी भिक्षा’ हे तीन कथा संग्रह मौज प्रकाशनातर्फे प्रसिद्ध झाले आहेत.
मराठीतील नामवंत साहित्यिकांच्या, मुलांना आवडतील अशा गोष्टी, चित्रमय पुस्तकांच्या स्वरूपात! या मालिकेतील ‘उशिरा उठणारं फुलपाखरू’ हे ‘पाण्याचे डंख’ या मौज प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या ललित लेखसंग्रहातून संपादित केलेली कथा आहे.