डॉ. मंजिरी निंबकर
गेली ३५ वर्ष शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहे. शालेय स्तरावर इंग्रजी, भुगोल, गणित व विज्ञान या विषयांचे प्राथमिक व माध्यमिक स्तरावर अध्यापन, बाल शिक्षिका प्रशिक्षण व अभ्यासक्रम निर्मिती व विकास मार्गदर्शन आणि विशेष कार्य त्यांनी केले आहे. प्राथमिक व माध्यमिक शिक्षक प्रशिक्षणे व ग्रंथालय प्रशिक्षणात साधन व्यक्ती म्हणून त्यांनी मार्गदर्शन केले आहे.
मुलांच्या स्वतंत्र लेखनाचा विशेष अभ्यास व यावर प्रकाश टाकणारे मुलांचे सृजनात्मक लेखन हे पुस्तक त्यांनी प्रकाशित केले आहे. तसंच मुलांचे ग्रंथालय या पुस्तकाचेही संपादन त्यांनी केले आहे. या पुस्तकाला स्व. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचा विशेष पुरस्कार प्राप्त झाला आहे.



