सुनीती नामजोशी
1941मध्ये मुंबईमध्ये जन्मलेल्या सुनीती नामजोशी, कवियत्री व नितीकथा लेखक आहेत. त्या मुंबईत वाढल्या, मात्र सध्या त्या इग्लंडच्या रहिवासी आहेत. त्यांनी बोधकथा, कविता, विविध कादंबऱ्या लिहिल्याच शिवाय मुलांसाठीही अनेक पुस्तके लिहिली.
सुनीती यांचे वडील मनोहर नामजोशी वैमानिक होते, तर आई सरोजिनी नामजोशी मूळ फलटणच्या होत्या. सुनीती यांचे शिक्षण हिमाचल प्रदेशातल्या वूडस्टॉक या अमेरिकन मिशन स्कूल आणि आंध्र प्रदेशातल्या रिषी व्हॅलीमध्ये झाले. त्यांनी 1964मध्ये भारतीय प्रशासकीय सेवा परीक्षा उत्तीर्ण होऊन अधिकारी म्हणून काम केले.
त्यानंतर अमेरिकेतून उच्च पदवी तर कॅनडातील विद्यापीठातून डॉक्टरेट पूर्ण केली. कॅनडातील टोरांटो युनिव्हर्सिटीत त्यांनी काही काळ प्राध्यापक म्हणून नोकरी केली. 1987 नंतर त्यांनी पूर्णवेळ लिखाण करण्याचा निर्णय घेतला.
त्यांच्यावर परदेशी लेखिकांचा प्रभाव आहे. त्यांनी मुलांसाठी काही पुस्तके लिहिली, त्यामध्ये अदितीची मालिका लिहिली आहे. त्यापैकी Aditi and the One-Eyed Monkey (अदिती अँड वन आईड् मंकी) या पुस्तकाचे मराठी रूपांतर अदितीची साहसी सफर नावाने, डॉ. संगीता बर्वे यांनी केला आहे.

