महाश्वेता देवी

महाश्वेता देवी

महाश्वेता देवी यांचा जन्म 14 जानेवारी 1926 साली झाला. त्या लेखिका होत्याच शिवाय सामाजिक कार्यकर्त्या म्हणून त्यांची ओळख होती.
तत्कालीन अविभाजित भारताच्या ढाकामध्ये त्यांचे शालेय शिक्षण झाले. त्यानंतर महाविद्यालयीन शिक्षण पश्चिम बंगालमध्ये झाले तर कोलकाता विद्यापीठातून त्यांनी इंग्रजीतील उच्चपदवी प्राप्त केली. याच विद्यापाठात त्यांनी इंग्रजी व्याख्याता म्हणून नोकरी केली.
१९८४ साली त्यांनी पूर्णवेळ लेखन कऱण्यासाठी निवृत्ती घेतली. महाश्वेता देवी यांना 1979मध्ये साहित्य अकादमी पुरस्कार, त्यानंतर पद्मश्री पुरस्काराने त्यांना गौरवण्यात आले. 1997मध्ये त्यांना  पुरस्काराने गौरवण्यात आले होते.