शंकुतला फडणीस

शकुंतला फडणीस

शकुंतला फडणीस यांची ओळख बालसाहित्यिक म्हणून होती. त्यांची एकंदर २८ पुस्तके प्रकाशित झाली. त्यापैकी तीन पुस्तकांना राज्यस्तरीय व चार पुस्तकांना खासगी पुरस्कार मिळाले आहेत.
प्रसिद्ध व्यंगचित्रकार शि. द. फडणीस यांच्या त्या पत्नी होत्या.
कौतुकाचा गंगाराम, सोन्यासारखी संधी, किल्लीची गुरुकिल्ली सारखी त्यांची पुस्तके मुलांना आजही आवडतात.
मोठा टाईपमधील ही पुस्तके मुलांना वाचायलाही सोपी आहेत.