मधु मंगेश कर्णिक

मधु मंगेश कर्णिक

मधु मंगेश कर्णिक सिंधुदुर्गातील कणकवलीचे  रहिवासी आहेत. ते नामवंत मराठी कथाकार, कांदबरीकार, कवी आणि संवाद लेख आहेत. सुरुवातीला एसटीमध्ये नोकरी केली. त्यानंतर गोवा सरकारच्या प्रसिद्धी खात्यात, त्यानंतर महाराष्ट्र राज्याचे जनसंपर्क अधिकारी म्हणून कार्यरत होते.
वयाच्या पन्नाशीत त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला आणि लिखाण आणि साहित्य कार्यास वाहून घेतले. कोकण मराठी साहित्य परिषदेच्या स्थापनेत त्यांचा सिंहाचा वाटा होता.
अनेक पुरस्कारांनी आणि मानसन्मानांनी त्यांना गौरवण्यात आले आहे. त्यांचे अनेक कथा, कथासंग्रह प्रसिद्ध आहेत.
लहान मुलांना सहज भावतील अशा कथांपैकी एक ‘चोरी’ ही कथा.