आनंद चाबुकस्वार
आनंद चाबुकस्वार हे लहानपणापासून नाट्य आणि रंगभूमीशी संबंधित आहेत. आनंद यांनी लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेता म्हणून काम केले असून त्यांनी मराठी कवितांवर आधारित विशेष प्रयोग केले आहेत.
ते अर्थशास्त्र या विषयात पदवीधर आहेत. आंतरराष्ट्रीय व्यापार आणि इंग्रजी साहित्यामध्ये त्यांचे पदव्युत्तर शिक्षण झाले आहे. नाट्योपचार (dramatherapy) या विषयात त्यांचे विशेष प्रशिक्षण झाले असून या विषयावरील अनेक कार्यशाळांमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांनी प्रशिक्षक म्हणून काम केले आहे.
भारतामध्ये WCCL Foundation या संस्थेसाठी ABT (arts based therapy) या विषयाचा अभ्यासक्रम निर्माण करणार्या तज्ज्ञ गटात त्यांचा सहभाग असून, याअंतर्गत त्यांनी अनेक ABT प्रकल्पांसाठी उपचार तज्ज्ञ, प्रशिक्षक, आणि पर्यवेक्षक म्हणून १८ वर्षे काम केले आहे.
या विषयावरील त्यांचे संशोधन व लेखन UK आणि USA मध्ये तसेच आंतरराष्ट्रीय नियतकालिकांमध्ये प्रकाशित झाले आहे.
भारतात निरनिराळ्या ठिकाणी ते नाट्यशिक्षणावरील कार्यशाळा घेतात. ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात उपयोजित रंगभूमी हा विषय शिकवतात.


