दीनानाथ दलाल

दीनानाथ दलाल
दीनानाथ दलाल – एक अभिजात कलावंत. त्यांनी आपल्या अभिजात दृष्टीने मराठी प्रकाशन व्यवसायाचा चेहरा बदलून टाकला, त्याला सौंदर्याचं वरदान दिलं. त्यांच्या कामाने मराठी माणसाला चित्रकलेची नवी दृष्टी मिळाली. दलाल मूळचे गोव्याचे. त्यांनी मुंबईत चित्रकलेचे धडे घेऊन, १९३७ साली जी. डी. आर्ट परीक्षा उत्तीर्ण केली. त्या काळातील अनेक विद्यार्थ्यांप्रमाणेच त्यांनाही जाहिरात कलेने आकर्षित केले. त्यांनी अनेक मासिके, पुस्तके यांची मुखपृष्ठे केली. मात्र त्यांनी अभिजात कलेच्या व्यासंगाचे पावित्र्य आणि मांगल्य ओळखले होते. व्यक्तिचित्रण हा दलालांचा एक आवडता विषय होता. त्यांच्या व्यक्तिचित्रणाची ३ गटात विभागणी करता येते.
१. कमिशन वर्क
२. काल्पनिक चित्रे
३. स्वतंत्रपणे केलेली अभिव्यक्ती

व्यावहारिक कलाक्षेत्रात गढून गेलेले असतानाही त्यांनी आंतरिक अंगाने अभिजात अभिरुचीचा व्यासंग सर्वतोपरी जपला होता.