गोविंद गोडबोले
गोविंद गोडबोले हे मराठीतल्या बालसाहित्यातील महत्त्वाचं नाव आहे. एम.ए., बी.एड. व बीजे केल्यानंतर त्यांनी ९ वर्षं अध्यापनाचं काम केलं. त्यानंतर आकाशवाणीसाठी त्यांनी सह-संपादक व कार्यक्रम अधिकारी म्हणून काम केलं.
गोडबोले यांची मुलांसाठी ‘चॉकलेट’ ही पुस्तकांची मालिका गाजली. त्यात त्यांनी १६ पानी छोट्या छोट्या गोष्टींची पुस्तकं प्रकाशित करून त्यांची किंमत केवळ १ रुपया ठेवली. अशी एकूण ३७ पुस्तके गोडबोले यांनी लिहिली आहेत. मुलांसाठी कथा-कथनाचे अनेक कार्यक्रमही ते करतात. आजवर त्यांनी एकूण ७७ पुस्तकं लिहिलं आहेत. महाराष्ट्र राज्याचे बालवाङ्मयाचे तसेच आकाशवाणीचे अनेक पुरस्कारही त्यांना मिळाले आहेत.

