उषाशी लाहिरी
उषाशी लाहिरी यांनी दिल्ली विद्यापीठातून इंग्रजी साहित्यात एम.ए तसेच इंग्रजी अध्यापन या विषयात बी.एडची पदवी घेतलेली आहे. सध्या त्या ‘रूम टू रीड’ साठी काम करत आहेत. त्या आधी त्यांनी एका शिक्षण-तंत्रज्ञानविषयक स्टार्ट-अपसाठी काम केले व दिल्ली येथील प्रथितयश शाळेत इंग्रजी विषयाचे अध्यापनही केलेले आहे.
वाचन हा त्यांचा आवडता छंद. हॅरी पॉटरच्या तर त्या अगदी फॅन आहेत. त्यांना आपल्या मर्फी कुत्र्याबरोबर वेळ घालवायला आवडते.

