श्रीकृष्ण जनार्दन जोशी
जन्म : १ ऑगस्ट १९१५
मृत्यू : १३ जानेवारी १९८९
शिक्षण : मुंबई विद्यापीठातून बी.ए. (१९३८)
व्यवसाय : डिफेन्स अकाऊंटस् विभागात नोकरी.
लेखन प्रकार : कथा : १९३८ साली ‘स्त्री’ मासिकात पहिली कथा प्रकाशित. पांढरपेशांचे जग या पहिल्या संग्रहासह एकूण ३५ कथासंग्रह प्रकाशित.
कादंबरी : रघुनाथाची बखर, ऐलमा पैलमा (भाग १ ते ३), चार्वाक, धूमकेतू, काचपात्र इत्यादी; मनोहर माळगावकर, आर. के. नारायण यांच्या कादंबर्यांचे अनुवाद त्यांनी केले.
ललितलेख संग्रह : सूर्यापोटी, पुणेरी
लेखनविशेष : कनिष्ठ मध्यमवर्ग हा त्यांच्या लेखनाचा गाभा होता. ‘आनंदीगोपाळ’ या कादंबरीने चरित्रात्मक कादंबरीचा प्रवाह मराठीत आणला.
विशेष : त्यांच्या ‘यात्रा’ या कादंबरीवरून ‘साळसूद’ नावाची दूरदर्शन मालिका प्रसारित करण्यात आली. ‘रघुनाथाची बखर’ या कादंबरीवरून ‘व्यासपर्व’ हा चित्रपट तयार झाला.
पुरस्कार : आनंदी गोपाळ या कादंबरीला राज्यशासनाचा ह.ना. आपटे पुरस्कार व अन्य काही पुरस्कारही मिळाले.

