शिरीषा साठे

शिरीषा साठे क्लिनिकल सायकोलॉजिस्ट असून त्यांना मानसिक आरोग्य क्षेत्रातील ३८ वर्षांचा अनुभव आहे. त्यांनी 1978 साली पुणे विद्यापीठातून बी. ए. एम. एस पदवी मिळवली आणि 1998 साली एस. एन. डी. टी महिला विद्यापीठातून मानसशास्त्र विषयात उच्च पदवी घेतली आहे.
हेमा होनवाड यांच्यासह त्यांनी विधायक शिस्त पुस्तकाचे सहलेखन केले आहे. मुलांसाठी विधायक शिस्त अमलात आणताना प्रात्यक्षिकाचे आराखडे आणि प्रत्यक्ष अनुभवही पुस्तकातून समोर आणतात.